कॉम्पुटर शिका चक्क फुकट!

मराठा समाजातील विद्यार्थांसाठी आनंदाची बातमी

माजलगाव: मराठा समाजातील विद्यार्थांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉम्प्युटर शिकण्यासाठी तुम्हाला आता पैसे खर्च करण्याची गरज उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन तुम्ही कॉम्प्युटर चक्क फुकट शिकू शकता.महाराष्ट्र शासनच्या सारथी व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने श्री इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन येथे मोफत संगणक (कॉम्प्युटर) कोर्स उपलब्ध करण्यात आला आहे.

अशी आहे योजना…

👉मोफत संगणक कोर्स 6 महिने

👉कोणासाठी :- जात प्रवर्ग : मराठा

👉18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे..

👉 6 महिन्याचा संगणकाचा डिप्लोमा कोर्स प्रवेश सुरू होत आहे.

 

मराठा प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. यासाठी मोजक्याच जागा शिल्लक असून 6 महिने रेगुलर श्री इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन येथे क्लासेस करावे लागतील. कॉम्प्युटर शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आजच्या या स्पर्धेच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कॉम्प्युटर चे ज्ञान असल्याशिवाय खऱ्या अर्थाने साक्षर म्हणवून घेता येत नाही.म्हणून मराठा समाजातील विद्यार्थांनी या अनमोल संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री इन्फोटेक कॉम्प्युटरचे संचालक प्रवीण शेजुळ सर यांनी केले आहे.

 

आवश्यक कागदपत्रे:

1) TC झेरॉक्स

2) 10 वी मार्क मेमो झेरॉक्स

3) डोमासाईल(रहिवास) प्रमाणपत्र

4) चालू वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र (10 लाखाच्या आत असावे)

5) EWS प्रमाणपत्र

 

येथे करा संपर्क:

श्री इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन

मोरेश्वर शाळेजवळ, शाहूनगर माजलगाव.

मोबाइल :9607071065, 8623919597

Leave a Reply