मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांना शिकवला ‘धडा’

परस्परविरोधी तक्रारीवर पाच जणांविरुध्द गुन्हे दाखल

माजलगांव( प्रतिनिधी):-मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय सदस्य असणाऱ्या दोन सदस्यांनी एकमेकांविरुद्ध रस्त्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे . ही घटना शनिवार दि . २६ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली असून शहर पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की , सुशील विजयकुमार साळुंके यांच्या फिर्यादीवरून ते लग्नाला जात असताना भारत भाऊसाहेब साळुंके हे त्यांना थांबवून म्हणाले की , तु माझ्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल होण्यासाठी जोर लावलास , सिलिंगची जमीन माझ्या ताब्यातून जाण्यासाठी प्रयत्न केलास , सांगली बँकेतील गहाण असलेली प्रॉपर्टी जाण्यासाठी तू व प्रकाश साळुंकेने प्रयत्न केलास . त्याचप्रमाणे भारत साळुंके यांचा मुलगा अजय साळुंके त्यावेळी तेथे आला व मनाला , तुझ्यामुळे व प्रकाश साळुंकेमुळे मी दोन वर्षे तोंड लपवून औरंगाबादला राहिलो . असे म्हणत त्याने शिवीगाळ व मारहाण केली . तर भारत साळुंके यांच्या फिर्यादीवरून ते नेहमीप्रमाणे गढ़ी रोडवरील हॉटेल रॉयल समोर उभे असताना चार चाकी वाहनातून सुशील विजयकुमार साळुंके , विजयकुमार निळकंठ साळुंके व हर्ष विजय साळुंके आले व म्हणाले , माझ्या विरोधातील ग्रामपंचायत बैठकीत का हजर होता . असे म्हणत यातील आरोपीतांनी चापट भुक्याने मारहाण करण्यास सुरुवात करून शिवीगाळ करत जीबे मारण्याची धमकी दिली . यावेळी मुलगा अजय साळुंके रस्त्याने जात होता . तो तेथे आला व भांडणाची सोडवा सोडवी करू लागला . दरम्यान भारत भाऊसाहेब साळुंके यांच्या फिर्यादीवरून सुशील विजयकुमार साळुंके , विजयकुमार निळकंठराव साळुंके व हर्ष सुशील साळुंके विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर सुशील साळुंके यांच्या फिर्यादीवरून भारत भाऊसाहेब साळुंके , अजय भारत साळुंके विरुद्ध गुन्हा दाखल आहे . भारत भाऊसाहेब साळुंके व विजयकुमार निळकंठराव साळुंके हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य आहेत . ज्या मंडळाचे आ . प्रकाश सोळंके अध्यक्ष आहेत . दरम्यान सदरील घटनेने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत असुन या प्रकरणाचे पडसाद स्थानिक राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे .

Leave a Reply