मागच्या गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून त्यामुळे किरकोळ खरेदीदारांपासून ते बाजारातील गुंतवणूकदारांपर्यंत सर्वच जण चिंतेत पडले आहेत
जवळपास आठवड्यापूर्वी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर देशांतर्गत आणि जागतिक बाजारात सोन्याच्या किमती घसरल्या आहे.
कारण काय
सोन्याच्या भावतील ही घसरण दोन-तीन दिवसांत वेगाने झाली. बजेट डे ट्रेडिंग, गुंतवणूकदारांची नफा-वसुली आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेत यामुळे सोन्यावर दबाव आला. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सपासून स्पॉट मार्केट आणि दागिन्यांच्या दरांपर्यंत सर्वत्र सोन्याच्या किमती कमी झाल्या.
देशातील सोनं-चांदीचे भाव
Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज सकाळच्या सत्रात राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,057 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,719 प्रति 10 ग्रॅम, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,043 प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
दरम्यान चांदीच्या भावात तर आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज दिल्लीमध्ये चांदीच्या भाव तब्बल 50,000 रुपयांनी घसरला असून 3 लाख रुपये प्रति किलो आहे.
MCX वर सोन्याच्या भावात तीव्र चढ-उतार
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. मागच्या दोन दिवसांत सोन्याचा दर तब्बल 20 टक्क्यांहून अधिक घसरला. आज सकाळी पुन्हा सोन्याचा भाव कालच्या तुलनेत 3% म्हणजेच 4,500 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,43,321 रुपये इतका झाला आहे.
राज्यातील सोनं-चांदीचे भाव
महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,51,530 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,900 रुपये इतका आहे. दरम्यान चांदीचा भाव प्रति किलो 3 लाख रुपये इतका आहे.