स्व.गोपीनाथ मुंडे यांनी वंचितांसाठी आयुष्यभर संघर्ष केला-डॉ.आनंदगावकर

बीड: माजलगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. माजलगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला . अँड मोहन कोरडे यांनी कुठल्याही वयाची अट न ठेवता तीन दिवसीय मोफत इंग्रजी संभाषण कला शिबाराचे शिकण्यासाठी मोफत शिबिराचे उद्घाटन आनंदगावकर यांनी केले. तसेच या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 100 मूकबधिर विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटपचा कार्यक्रम करण्यात आले .

यावेळी डॉक्टर प्रकाश नांदगावकर म्हणाले मुंडे साहेबांनी आयुष्यभर गरीब गरजू शोषित वंचित लोकांना आयुष्यभर सहकार्य करून प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला,आपल्या सर्वांसाठी मुंडे साहेब हे आदर्श आहेत त्यांचा आदर्श लक्षात घेत आपण देखील समाजातील गरजू गरीब लोकांना नेहमी मदत केली पाहिजे, त्याचबरोबर मुंडे साहेबांनी सर्वांना स्वाभिमानाने जगले पाहिजे ही शिकवण दिली आपण सर्वांनी देखील आयुष्यभर मेहनत कष्ट घेऊन कोणासमोर न झुकता स्वाभिमानाने जगून सर्वांना ती शिकवण द्यावी असे सांगून मुंडे साहेब अमर रहे या घोषणा आनंदगावकर यांनी दिल्या . यावेळी गौरी देशमुख रूपाली कचरे यांनी देखील मुंडे साहेबांच्या आठवणी ला उजाळा देत मुंडे साहेबांनी केलेला सर्वासाठी संघर्ष सागून आपणही त्यांची शिकवण घेत पुढील काळात वाटचाल करू असे सांगितले . तसेच तुकाराम बापू येवले डॉक्टर प्रशांत पाटील यांनीही आपल्या मनोगत सांगून मुंडे साहेबां विषयीच्या भावना व्यक्त केल्या , तसेच इंग्रजी विषयाचे महत्त्व जागतिक लेव्हल ला किती महत्त्वाचे आहे , इंग्रजी न आल्यामुळे किती प्रमाणात नुकसान होते हे सांगून पुढील काळात माजलगाव मध्ये घराघरात मनामनात इंग्रजीचे ज्ञान देण्याचा संकल्प या ठिकाणी फिनिक्स चे संचालक अँड मोहन कोरडे यांनी सांगत सर्वांना मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले. यावेळी कु.यशश्री काळे नी कोरडे सरांकडे इंग्रजी शिकल्यामुळे मला किती फायदा झाला हे सांगून इंग्रजी न आल्यामुळे मुलाखतीमध्ये आपली निवड होऊ शकत नाही त्यामुळे इंग्रजी येणे फार महत्त्वाचे आहे असे सांगून स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर इंग्रजी येणे किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना तिच्या आलेल्या काही अनुभवातून सांगितले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक विनायक रत्नपारखी यांनी केली तर प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी केले व मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त कुठलीही बॅनरबाजी न करता पंकजा मुंडे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही सामाजिक उपक्रम राबवत पुढील काळात मुंडे साहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करू असे सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी बबन सोळंके अशोक तिडके ज्ञानेश्वर मेंडके लतीफ नाईक दीपक मेंडके सत्यनारायण उनवणे अभय होके हनुमान कदम धनंजय सोळंके प्रल्हाद दळवी दत्ता महाजन शरद पवार किसन वगरे छबन घाडगे मनोज फरके , भाजपा पदाधीकारी शक्ती प्रमुख बुथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बबन शिरसठ यांनी केले.

Leave a Reply