Income Tax New Rules: पगारदारांसाठी महत्वाची बातमी! 1 एप्रिलपासून ‘फॉर्म 16’ बंद, ‘फॉर्म 130’ची एन्ट्री, टॅक्सचा हिशेब पूर्णपणे बदलणार

मार्च महिना जवळ आला की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पगारदाराची धावपळ सुरु होते. ‘टॅक्स सेव्हिंग’ आणि ‘डॉक्युमेंट्स’ गोळा करण्याासाठी जुळवाजुळव सुरु असते. पण आता यातून लवकरच सुटका होणार
करप्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

नोकरदारांना मिळणारा आता ‘फॉर्म 16’मध्ये बदल होणार आहे. त्याऐवजी एक नवीन आणि स्मार्ट फॉर्म असणार आहे. तो फॉर्म काय आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया, आगामी आर्थिक वर्षापासून, म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून पगार आणि टॅक्सचा हा हिशेब पूर्णपणे बदलणार आहे. कारण आता फॉर्म 16’ ऐवजी ‘फॉर्म 130’ असणार आहे.
किती टीडीएस (TDS) कापला जातो, हा महत्वाचा पुरावा म्हणजे म्हणजे फॉर्म 16 होता, पण येत्या 1 एप्रिलपासून हा फॉर्म बंद होणार आहे, ‘फॉर्म 130’ (Form 130) भरणे बंधनकारण आहे.
नव्या नियमांनुसार,

सर्व अर्ज ITR-1 ते ITR-7 पर्यंतचे आता नव्या रूपात असतील.

उत्पन्नाच्या प्रत्येक स्रोताची माहिती अधिक सविस्तरपणे द्यावी लागेल

प्री-फिल्ड फॉर्म्स. तुमचा बराचसा डेटा आता आधीच भरलेला असेल.

पगार, बँक व्याज आणि इतर उत्पन्न एकाच ठिकाणी दिसेल

माहिती अचूक असल्यास तुमचा टॅक्स रिफंड (Tax Refund) देखील आता अधिक वेगाने तुमच्या खात्यात जमा होईल.

काय आहे फॉर्म 130

तीन विभागात हा फॉर्म असेल.

भाग अ (Part A): कंपनीची (नियोक्ता) संपूर्ण माहिती असेल.

भाग ब (Part B): एकूण पगार आणि कापलेल्या टीडीएसचा (TDS) सारांश असेल.

भाग क (Part C): पगाराचा पूर्ण ब्रेक-अप (Basic, HRA, Allowances) आणि गुंतवणुकीची (Deductions) सविस्तर गणना असेल.

Leave a Reply