‘सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे’

‘सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे’

छत्रपति संभाजीनगर: उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन न्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

 

छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या आवारात वकील चेंबरचे फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन न्यायाधीश गवई यांनी केले. सामान्य नागरिकांसाठी कमी वेळेमध्ये न्याय देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलाने पक्षकारासाठी न्यायव्यवस्थेचे महत्वाचे माध्यम म्हणून काम करावे. समाजातल्या शेवटच्या आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्व न्याययंत्रणेने काम करावे ,तसेच ‘राईट टू जस्टिस’ हा मौलिक अधिकार त्यांना प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य या माध्यमातून करण्यात यावे. दिवसेंदिवस न्यायालयाच्या प्रकरणात वाढ होत असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे असेही ते म्हणाले.

Leave a Reply