पवन मोगरेकर
अमृतसरच्या हरी मंदिर डाव्यांच्या गोल्डन टेम्पल मधे जरनेलसिंह भींद्रनवाले तब्बल दोन वर्षे लपून बसला होता. त्याने सुवर्णमंदिरावर कब्जा करून अकाली तख्तलाच स्वतःचा अड्डा बनवले होते तरीही काँग्रेस हतबल होती.जेंव्हा गोष्टी हातात होत्या तेंव्हा काँग्रेसनेच शिरोमणी अकाली दलच्या विराधात जरनेलसिंहला ताकद देऊन त्याला पोसले होते.थोडक्यात जरनेलल सिंह हा शिरोमणी अकाली दलाच्या विरोधात काँग्रेसने पोसलेला म्होरक्या होता.
1975 पासून भींद्रनवाले एक एक हत्या करत गेला परंतु काँग्रेसने त्याच्या विरुद्ध कोणतीही कडक भूमिका घेतली नाही. परंतु जेव्हा काँग्रेसनेच पोसलेला जरनेल सिंह हे प्रकरण काँग्रेसच्या हाताच्या बाहेर गेले तेंव्हा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात निष्पाप शिखांच्या रक्ताची रंगपंचमी या देशाने पाहिली.
अमृतपाल हा जरनेल सिंहच्याच वाटेवर होता आम आदमी पक्षही मतांच्या लांगुनतचालनासाठी 1980 च्या दशकातील काँग्रेसच्या भूमिकेत गेली होती.संजय गांधीच्या भूमिकेत राहुल गांधी आले होते कदाचित केंद्रात ग्यानी झैल सिंह (1980)सारखा कमकुवत गृहमंत्री असता तर अमृतपाल पुन्हा सुवर्ण मंदिरातही घुसला असता सर्व काही तयार होतं.सोशल मीडियात डाव्यांची टूल किटही तयारीत होती पण मोदी शाह या जोड गोळीने या सर्वांचा टप्यात आणून कसा कार्यक्रम केला हे कुणाला समजलच नाही.
केवळ 15 दिवसाच्या आत अमृतपाल आणि त्याच्या खलिस्तानचा खेळ मोदी, शाह ने संपवला होता.काही महिन्यांपूर्वी पीएफआय आणि आता खलिस्तानी वळवळ दडपून मोदी,शहांनी देश किती सुरक्षित भक्कम हातात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले तरीही खलिस्तानी हे अपत्य कुणाचे या प्रश्नाचे उत्तर देशवासियांना मिळायलाच हवे.