लग्न वरातीवर तुफान दगडफेक

बुलढाणा/चिखली प्रतिनिधी

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून दगडफेक, तोडफोड व दंगलीच्या घटना घडत आहेत रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरात तुफान राडा झाला त्यात एका मंदिरावर दगडफेक झाली या नंतर अकोला व शेवगाव येथे दंगल होऊन हिंदू वस्त्यांवर दगडफेक करण्यात आली.

नाशिक त्रिम्बकेश्वर येथील प्रकरण ताजे असताना काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे लग्न वरातीवर तुफान दगडफेक करण्यात आली.वरातीमधे प्रभू श्रीराम यांचे गाणे लावल्याचे निमित्त होऊन वरातीवर हल्ला करण्यात आला या दगडफेकीत लग्न वरातीत सामील झालेले तेरा जण जखमी झाले असून यात महिलां सह लहान मूलांचाही समावेश असल्याचे समजते अचानक झालेल्या या हल्ल्याने लग्न वऱ्हाडी मंडळी गांगरून गेले दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला पोलीस पुढील तपास करत असून याप्रकरणी पंधरा जणांना अटक केल्याची वार्ता आहे. महाराष्ट्रात वारंवार या प्रकारच्या घटना घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply