मुंबई : राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि नागरिकांकडून होणारी मागणी लक्षात घेता याविरोधात कायदा करण्यात येणार असल्याचे समजते.राज्य विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
लव्ह जिहाद, बळजबरी वा फसवणुकीने धर्मांतरण असे प्रकार वरचेवर समोर येत आहेत.मुंबईतील श्रद्धा वालकर प्रकरणाने देश सुन्न झाला आहे.आरोपी आफताबने तीचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते.अशा कित्येक ‘श्रद्धा’ देशभरात लव्ह जिहादला बळी पडत आहेत.महाराष्ट्रात ही या घटना वाढल्या आहेत.या विरूद्ध हिंदु समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने जिल्हा जिल्ह्यात मोर्चे आंदोलने करुन लव्ह जिहाद व धर्मांतरण विरूद्ध कठोर कायदा पारित करण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे.अशा प्रकारचा लव्ह जिहाद विरुद्ध चा एक कायदा सध्या उत्तर प्रदेशात अस्तित्वात आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करणे, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणे तसेच अशा विवाहाला सहाय्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत.
काय आहे उत्तर प्रदेशच्या कायद्यात?
या कायद्यानुसार दोषी आढळल्यास आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंडाची तरतूद आहे. यामध्ये पीडित मुलगी जर 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणती संस्था किंवा संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल तर त्याला तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूदही आहे.