‘त्याने’ ‘तिला’ करोडपतीचे स्वप्न दाखवले अन्…

दिदी कसम खाता हूं… झुठ नही बोलूंगा…’ म्हणत घातली गळ

बीड: बीडमध्ये कौन बनेगा करोडपतीच्या नावे भामट्याने महिलेला तब्बल ३ लाखांचा गंडा घातला आहे. महिलेला आपण फसवले गेलो आहोत हे समजण्यास जवळपास एक महिना लागला.

ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राइममध्ये मोठ्या झपाट्याने वाढ होत असली तरी यात फसवल्या जाणाऱ्या लोकांना लालच महागात पडत असल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येतेय.अनेक सायबर क्राईम करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या शक्कल लढवत सर्वसामान्य नागरिकांना लुटताना पाहायला मिळत आहेत.बीडमध्ये देखील एक थक्क करणारी घटना घडली आहे.

 

सायबर गुन्हेगार एखाद्याला कसे फसवतील हे सांगता येत नाही. यामध्ये अनेक प्रकार आत्तापर्यंत पुढे आले आहेत. काही ठिकाणी कर्ज देऊन तर काही ठिकाणी ऑनलाइन अश्लील व्हिडिओ दाखवण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा आतापर्यंत हजारो नागरिकांना बसला आहे. यामध्येच सध्या बीड जिल्ह्यात एक घटना घडली ती म्हणजे ऑनलाईन केबीसीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम लंपास केली आहे. तुम्हाला केबीसीत प्रवेश मिळून देतो असं सांगून बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका महिलेला फसवण्यात आले आहे. याप्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

केबीसीची (कौन बनेगा करोडपती KBC) २५ लाख रुपयांची लॉटरी व अलिशान गाडी लागल्याचे आमिष सायबर भामट्याने सामान्य कुटूंबातील अश्विनी मुंजाबा नांदे (वय २५, रा. पहाडी दहीफळ ता. धारुर) या महिलेला दिले. ‘दिदी कसम खाता हूं… झुठ नही बोलूंगा…’ असे म्हणत त्या भामट्याने महिलेचा विश्वास संपादन केला अन् महिनाभरात जवळजवळ तीन लाख रुपये उकळले.

Leave a Reply