राष्ट्रपिता महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार साक्षात पांडुरंगाच्या भूमीत मिळाला हे मी माझे भाग्य समजतो:दत्ता वाकसे

वडवणी (प्रतिनिधी): विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने दरवर्षी दिले जातात पुरस्कार सामाजिक राजकीय शैक्षणिक यासह विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना गौरविले जाते आज या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार,मला देऊन जो, सन्मान दिला त्या सन्मानाच्या माध्यमातून मला आगामी काळामध्ये चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले त्याचबरोबर पांडुरंगाच्या भूमीमध्ये तेही,साक्षात पांडुरंगाच्या भूमीमध्ये माझा सन्मान झाला पुरस्कार दिला हे माझे मी भाग्य समजतो असे प्रतिपादन पुरस्कार सन्मान सोहळ्याला उत्तर देताना शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे व्यक्त, केले यावेळी व्यासपीठावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत दादा पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत लक्ष्मणराव ढोबळे,आणि अनिल सावंत व्हाईस चेअरमन भैरवनाथ शुगर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अजयकुमार सर्वगोड, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, विठ्ठल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ बी पी रोंगे सर, मार्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यासह विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरी नगरीचे नगरसेवक डी राजसर्वगोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष नितीन भाई काळे, सचिव अनिल ननवरे सर, समिती सचिव विलास जगधने सर यासह आदी मान्यवर उपस्थित होते यासह भीमसैनिक पंढरपूर नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे म्हणाले की गोरगन कष्टकरी दिनदलीत, शेतकरी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे हा उद्देश मनाशी बाळगून सतत सामाजिक कार्यामध्ये स्वतःला मी झोकून दिलेले आहे आगामी काळातही मी छोटे छोटे प्रश्नांसाठी सर्वसामान्य कामासाठी कार्यतत्पर राहणार आहे. मला पुरस्काराच्या माध्यमातून दिलेलं बळ पुढे जाण्यासाठी सर्वसामान्य कामे करण्यासाठी नक्कीच ऊर्जा देईल आणि तीच ऊर्जा नव्या जोमाने घेऊन मी आगामी काळात वंचितांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी काम करत राहील एवढेच मी या ठिकाणी व्यक्त करतो असं देखील बोलताना शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी व्यक्त केले.

 

दत्ता वाकसे म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान- चेअरमन अभिजीत पाटील

दत्ता वाकसे यांना मी सन 2014 च्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पंढरपूर ते बारामती पदयात्रेपासून ओळखत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांचे काम चांगले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ते सतत कार्यरत असतात काम करत असतात छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचे काम ते करत असतात म्हणूनच त्यांना मी मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणतो विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

 

चळवळीतली माणसंच सर्वसामान्यांचे प्रश्न ओळखू शकतात-नगरसेवक डि राज सर्वगोड

 

महापुरुषांचे विचार आत्मसात करून चळवळीतील कार्यकर्तेच स्वतःच्या पायामध्ये भिंगरी बांधून सर्वसामान्य माणसाचे काम करू शकतात दत्ता वाकसे यांचे काम अतिशय चांगले आहे त्यांच्या कामाचा गौरव आमच्या प्रतिष्ठानकडून व्हावा असे आम्ही सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी ठरवले आणि त्यांना राष्ट्रपिता महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार आज प्रदान करण्यात आला आगामी काळामध्ये त्यांच्या हातून सर्वसामान्याचे कामे व्हावेत प्रश्न सुटावेत त्यांचं काम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पहात आहोत अतिशय चांगले काम असून त्यांच्या कामाचा गौरव या ठिकाणी आम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून केलेला आहे असे बोलताना पंढरी नगरीचे नगरसेवक डी राज सर्वगोड यांनी व्यक्त केले.

Leave a Reply