ऑनलाइन गेमच्या नादात तरुणाने गमावले तब्बल ४० लाख रुपये!

जालना जिल्ह्यातील घटना

Jalna News: ढगी(जी.जालना) येथील एका तरुणा सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. भारतात बंदी आसलेल्या मॉस्ट बेट नावाच्या गेमच्या नदापायी तरुण थोडे थोडके नव्हे तब्बल ४० लाख रुपये गमवून बसला आहे.

 

जालनाः जुगाराचं व्यसन किती महागात पडू शकतं हे आपण महाभारतात पाहिलेलं आहे.पाच पांडव जुगारात राज्य,राजवाडा,आणि द्रौपदी सुद्धा गमावून बसले होते. जोडीला बारा वर्षांचा वनवास भोगावा लागला. पण इतिहासातून धडा घेईल तो माणूस कसला? असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जुगारात होतं नव्हतं ते सर्व गमावून बसण्याची वेळ जालना जिल्ह्यातील ढगी गावातील एका तरुणावर आली आहे.

 

त्याचे झाले असे की,कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे सर्व व्यवहार बंद झाले. शाळा-महाविद्यालये ऑनलाईन क्लास घेऊ लागली. त्यामुळे लहान मुले, तरुणांच्या हाती मोबाईल आला. क्लास पाहता पाहता मुले कधी ऑनलाईन गेमच्या आहारी गेली हे पालकांच्या लक्षातच आलं नाही. जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा वेळ निघून गेलेली होती.सध्या मुलं ऑनलाइन जुगाराच्या नादा पायी आर्थिक नुकसान करुन घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यात Jangali Rammi जंगली रम्मी,My 11 Circle, Dream11,My Team 11 आदी सह अनेक ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

 

ऑनलाईन गेमच्या नादात एका तरुणाने तब्बल ४० लाख रुपये गमावल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या ढगी गावात घडला आहे. परमेश्वर केंद्रे असं या तरुणाचं नाव असून ऑनलाइन गेमच्या नादात त्याला शेत जमीनही विकावी लागली आहे. गेल्या वर्षभरापासून परमेश्वरला मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याचं व्यसन लागलं.ऑनलाइन गेम खेळत असताना सुरुवातीला १००, ५०० आणि हजार रुपयांनी हा गेम खेळत होता. खेळात सुरुवातीला त्याला काहीं रुपयांचा फायदा झाल्यानें त्यास या गेमची चटक लागली होती. काम न करता पैसे मिळू लागल्याने त्याने मग जास्त पैसे लावायला सुरुवात केली.पण हळूहळू हे पैसे सगळे डुबत गेले. हजार पाच हजारांचा आकडा कधी लाखांच्या पार गेला हे त्यालाही कळलं नाही.जवळचे सर्व पैसे संपल्यावर त्याने मित्र, सावकार यांच्या कडून उसने पैसे घेण्यास सुरुवात केली. डोक्यावर मोठं कर्ज झाल्यानें शेवटी नैराश्यात परमेश्वरला आपली शेत जमीनही विकावी लागली. एका वर्षातच त्याचे ऑनलाइन गेममध्ये तब्बल ४० लाख रुपये बुडाले. परदेशी कंपनीनं तयार केलेला मॉस्ट बेट हा गेम भारतात खेळण्यास परवानगी नाही. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध नाही. खेळणाऱ्या व्यक्तीस तो वेगळ्या प्रकारे डाऊनलोड करून घ्यावा लागतो. यामध्ये गेमिंगचे अनेक प्रकार आहेत.सुरुवातीला हा खेळणाऱ्याला बोनसचं आमिष दाखवून गेम खेळण्यास भाग पाडलं जातं. एकदा खेळणारा या गेमच्या आहारी गेला की सर्वस्व गमावून बसतो.परमेश्र्वरचं ही असच काहीसं झालं.या गेम चे नादात आपली शेत जमीन हातची गेल्यावर कुठे परमेश्वरचं डोकं ताळ्यावर आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्याने पोलिस स्टेशन चे दार ठोठावले.

#Maha_Jagaran #Mahajagaran

Leave a Reply