माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ठरणार रंगतदार;१८ जागांसाठी १७२ अर्ज

Majalgaon Market Committee Election 2023

माजलगाव, दि.३: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिल २०२३ ला होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण १८ जागांसाठी १७२ जणांनी इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकी साठी आज दि.३ सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत १७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण १८ जागांसाठी निवडणूक होत असून यात व्यापारी मतदार संघात २ जागेसाठी २३ उमेदवारी अर्ज, हमाल माथाडी १ जागेसाठी १४ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत ४ जागेसाठी ४४ उमेदवारी अर्ज, सेवा सहकारी संस्था ११ जागेसाठी ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण १७२ उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. छाननी मध्ये किती उमेदवारी अर्ज वैध ठरतात व किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात यावर पुढील दिशा ठरणार आहे.

Importent Date महत्वाच्या तारखा
अर्ज छाननी:दि. ५ एप्रिल
उमेदवारी माघार घेणे: दि.६ एप्रिल ते दि.२० एप्रिल मतदान: दि.३० एप्रिल २०२३ रोजी
सकाळी ७ ते दुपारी ३ वा.
मतमोजणी: त्याच दिवशी ४ वाजता

यांनी केले अर्ज दाखल
विद्यमान सभापती संभाजी शेजुळ, नितीन नाईकनवरे,आमदार प्रकाश सोळंके यांचे पूत्र वीरेंद्र सोळंके, जयदत्त नरवडे, अच्युत लाटे, निलकंठ भोसले आदींनी अर्ज दाखल केले आहेत.

Leave a Reply