काल झालेल्या राम जयंती मधे आवाजाची मर्यादा वाढवल्याचे कारण देत प्रभू श्रीराम जयंती उत्सव समिती आयोजकांवर माजलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
काल माजलगाव शहरात प्रभू श्रीराम च्या जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते झेंडा चौकापासून सुरू झालेली जयंती रात्री मर्यादित वेळेच्या आत आयोजकांनी थांबवली परंतु हनुमान चौकात आवाजाची मर्यादा वाढवल्याचे कारण देत माजलगाव पोलिसांनी श्रीराम जयंती आयोजकांवर बी एन एस 223 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे माजलगावातील हिंदू संघटनांमध्ये पोलिसांप्रती तीव्र रोष आहे.
संपूर्ण जिल्ह्यात डी. जे वाजले माजलगावातच पोलिसांना काय अडचण?
काल रामनवमीनिमित्त संपूर्ण भारतात राम भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला होता ठीक ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बीड जिल्ह्यातही बीड, परळी, धारूर, अंबाजोगाई, वडवणी येथे डीजे वाजले परंतु त्या ठिकाणच्या पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेत राम भक्तांना सहकार्य केले परंतु कर्तव्यदक्ष माजलगाव पोलिसांना मात्र रामाच्या गाण्याचा थोडाही आवाज सहन झाला नाही.दुपार पासून माजलगाव पोलीस राम भक्तांच्या मागे लागले होते. नवा मोंढा समोर त्यांनी जयंती साठी आलेला डी. जे. अडवला तब्ब्ल दोन तास त्यांनी राम भक्तांची परीक्षा पहिली. यावेळी माजलगावातील अनेक जैष्ट मंडळीनी पोलिसांना विनंती केली तेंव्हा पोलिसांनी डी. जे सोडला परंतु शेवटी दुसऱ्या दिवशी जयंती आयोजकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांचा आत्मा शांत झाला.
आमदारांची विधानसभेत पी.आय. च्या कारभारा विरुद्ध तक्रार.
माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दोन दिवसापूर्वीच विधानसभेत माजलगावचे पीआय सूर्यतळ यांच्या विरोधात प्रश्न विचारला होता.माजलगावात गेल्या वर्षभरापासून चोरी, घरफोडी, दारू,गुटक्याचा सुळसुळाट व अवैध धंदे वाढल्याची तक्रार आ. प्रकाश सोळंके यांनी दिली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. माजलगावात अवैध धंदेवाल्यांना पाठबळ व राम भक्तांवर गुन्हे दाखल झाल्याने माजलगाव पोलिसांप्रती हिंदू समाजात तीव्र नाराजी आहे.लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे स्थानिक पी आय च्या कारभाराची तक्रार करणार असल्याचे माजलगावातील भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.