अध्यक्ष धैर्यशील सोळंके यांची माहिती
बीड, दि.९ (बातमीदार): लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याकडुन गळीत हंगाम २०२२-२३ मधील दिनांक ३०/११/२०२२ अखेर गाळपास आलेल्या ऊसाचा पहिला अॅडव्हान्स हप्ता प्रती में टन रुपये २४००/- प्रमाणे दिनांक ८/१२/२०२२ रोजी बँकेत वर्ग केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली.
कारखान्याने सन.२०२२-२३ या चालू हंगामात मा. आ. श्री.प्रकाशदादा सोळंके साहेब व संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली आजअखेर १७ गाळप दिवसामध्ये ९.४०% सरासरी साखर उता- याने ८८२०० मे.टन ऊसाचे गाळप करुन ५१७०० क्विंटल रॉ शुगरचे उत्पादन घेतलेले आहे. याबरोबरच कारखान्याचा आसवणी व को. जनरेशन प्रकल्प सुरु असुन या हंगामात आजअखेर १९७७२९७ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेवुन ३३३२७४४ युनीट विज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस विक्री केलेली आहे.
दिनांक २१/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत ५०९०८.१६१ मे. टन ऊस गाळपाच्या पहिल्या हप्त्याची प्रती मे.टन रुपये २४००/- प्रमाणे होणारी रक्कम संबंधीत ऊस उत्पादकांच्या बँक खाती आजचवर्ग केली असुन ऊस उत्पादकांनी आपल्या नजिकच्या बँक शाखेशी संपर्क करुन आपली रक्कम घेवुन जावी आणि या गाळप हंगामाचे १३ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्यिष्ठ पुर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी ऊस गाळपास देवुन सहकार्य करावे असे आवाहन मा. चेअरमन श्री. धैर्यशीलकाका सोळंके यांनी केले.
चालु हंगामात ऊस बीलाचा अॅडव्हान्स पहिला हप्ता प्रती मे.टन रुपये २४००/- प्रमाणे वाटप ऊस उत्पादकामधुन संचालक मंडळाचे प्रती समाधान व्यक्त करण्यात येत आहे.