मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडलेल्या मंत्री मंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.मंत्रिमंडळ निर्णय :
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द
- कोविडमुळे झालेल्या विपरित परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ५०० हेक्टर जमिनीला फायदा
- भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुपटीने वाढ. आता दरमहा २० हजार रुपये मिळणार
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमूर्ती यांचे अतिरिक्त सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता
- नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातील सुविधांसाठी २५ कोटी ८५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय
- अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देणार
- ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. अधिसंख्य पदांवर सामावून घेणार
- ‘जेएसपीएम विद्यापीठ, पुणे’ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता
- राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र. कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केल्याप्रमाणे होणार. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करणार
- नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजुरी. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार
- एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
- आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
- आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन आणि आयबीपीएस या कंपन्यांमार्फत घेण्यात येणार. भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा