‘ते’ विधान राहुल गांधींच्या अंगलट!

दादर पोलिस ठाण्यात आज तक्रार दाखल होणार…

मुंबई,दी. १७ (प्रतिनिधी): सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आज दादर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे हेदेखील जाणार आहेत अशी माहिती रणजीत सावरकर यांनी दिली.

काय म्हणाले राहुल गांधी….

सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

Leave a Reply