“मराठे मुर्दाड नव्हेत, की धारदार आहेत!” मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावले…

संग्रहित छायाचित्र

राजगुरुनगर: येत्या २२ ऑक्टोबर रोजी मी मराठा आरक्षण आंदोलनाची भूमिका जाहीर करणार आहे. मग ते आंदोलन सरकारला पेलवणार ही नाही आणि झेपणारही नाही. त्यामुळे सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका जाहीर करावी, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले .

मराठा आरक्षण प्रश्नी जालना जिल्यातील सराटी आंतरवली येथे अगोदर उपोषण व पुढे मोठी भव्यदिव्य सभा घेऊन पुढे आलेले मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.आज ( दिनांक २० ऑक्टोंबर) पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील सभते बोलताना ते पुढे म्हणाले की, सध्या आम्ही शांत आहोत म्हणजे प्रश्न विसरलो आहोत असं नाही. आम्ही पूर्ण तायरीनिशी कामाला लागलो आहोत. मराठा मुर्दाड आहेत, अशी टीका केली जाते. परंतु इथं येऊन बघा मराठे मुर्दाड आहेत की धारदार आहेत. जरांगे म्हणाले की, हा शेवटचा डाव आहे… आपल्याला जिंकायचं आहे! तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आपल्याला शांत राहून आरक्षण मिळवायचं आहे. सरकार आपल्यावर डाव टाकण्याच्या प्रयत्न करत आहे.तेंव्हा सर्व समाज बांधवांनी शांत राहनूच आरक्षणाची मागणी करायाची आहे.

सभेत गोंधळ घालण्याचा तरुणाचा प्रयत्न

दरम्यान, या सभेत मनोज जरांगे पाटील यांचे भाषण झाल्यानंतर काल संभाजीनगर येथे आत्महत्या केलेल्या कावळे यांना श्रध्दाजंली देण्याचा कार्य्कार्म सुरु असतानाच अचानक एका आंदोलकाने मंचावर येत माईक हिसकावून घेत भाषण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभेमध्ये काही काळ निर्माण गोंधळ झाला. या तरूणाने मंचावर जाऊन भाषण करण्याचा आणि घोषणा देण्याचा प्रयत्न केला. तो आक्रमक दिसून आला, त्याने माईक हातात घेत बोलण्याचा प्रयत्न केला. सभेचे आयोजक व पोलसांनी आवरण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply