सर्वधर्मीय रुग्णांसाठी आधार ठरताहेत डॉ. ओमप्रकाश शेटे
माजलगाव (प्रतिनिधी): रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर अचानक एक मुस्लिम महिला तीन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन आली. बाळाचे डोके मोठे होते आणि डोक्यात पाणी झाले होते व कमरेला एक मोठी गाठ होती. महिलेस पाहताच डॉ.ओमप्रकाश शेटे साहेब गाडीतून उतरले. आणि परत सभा मंडपात जाऊन त्या लहान मुलीला काय झाले ते पाहण्यासाठी थांबले….
अरफत मोहल्ला माजलगाव येथे राहणारे अझरुद्दीन इनामदार हे मिस्त्रीच्या हाताखाली मजूर म्हणून काम करतात. त्यांची ही मुलगी.महक तिचे नाव.त्यांना या लहान मुलीला कुठे घेऊन जावे, आणि काय करावे? हेच समजत नव्हते. कोणीतरी त्यांना सांगितले होते की,”तुम्ही शेटे साहेबांना भेटा तो देवमाणूस तुम्हाला नक्कीच मदत करेल.” म्हणून ती महिला आपल्या बाळाला घेऊन धावतपळत आली होती…
डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी आजारासंबंधी सर्व माहिती जाणून घेतली. त्वरित मुलीच्या वडिलांना फोनवर बोलून मुलीला मुंबई येथे एस आर सी सी या हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. पण आजारी मुलीचे आई-वडील हे दोघेही अशिक्षित असल्याने मुंबईला जाण्यापासून ते दवाखान्यातील सर्व तपासण्या, एमआरआय, एक्स-रे या प्रत्येक वेळी ते सारखे फोन करत होते. प्रत्येक वेळी शेटे साहेब त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगत होते व वेळोवेळी ‘फॉलोअप’ घेत होते. सर्व तपासण्या झाल्यावर दोन्ही ऑपरेशनचा खर्च जवळपास ४ लाख रुपये येत होता. अशावेळी शेटे साहेब यांनी ३ लाख ४० हजार रुपये हॉस्पिटलला आठ दिवसांमध्ये मंजूर करून घेतले. आणि चिमुकल्या महकचे ऑपरेशन यशस्वी झाले. अन् डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या प्रयत्नाने बाळाचे पिता अझरुद्दीनच्या जिवनात पुन्हा ‘महक’ दरवळला…!
कसलीही ओळख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी या बाळाची काळजी घेत तिला नवजीवन दिले.
“कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती” हा मूलमंत्र जपत ते आपले जीवन जगत आहेत. म्हणुनच तर त्यांच्या या अफाट कार्याची पावती म्हणुन लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे ‘देवदूत’ ही उपाधी बहाल केली आहे…!
महाराष्ट्रातीलंच नव्हे तर देशातील विविध कामात डॉ.ओमप्रकाश शेटे साहेब व्यस्त असतात. परंतु एवढ्या व्यस्ततेत असतांना सुद्धा शेवटच्या घटकातील गोर गरीब रूग्णांना न्याय देण्यासाठी ते तत्पर असतात. पक्ष, जात, धर्म, पंथ काही न मानता, सर्वसामान्य व गरजू लोकांच्या हाकेला साद देणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.