मंदिराच्या पायऱ्या तोडल्याने दोन महिन्यापासून मारुतीचे दर्शन बंद

मोगरा ग्रामस्थांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार

 

माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील जागृत देवस्थान असणाऱ्या मारुती मंदिराच्या परिसरात खोदकाम करत असताना हलगर्जीपणाने गुत्तेदाराने मंदिराच्या पायऱ्या नष्ट केल्यामुळे दोन महिन्यापासून मारुतीचे दर्शन बंद झाले आहे.त्यामुळे बेजबाबदार गुत्तेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

तालुक्यातील मोगरा येथे जागृत मारुतीचे देवस्थान आहे.या ठिकाणी सभा मंडपाचे काम सुरू करण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत.तब्बल दोन महिन्यापासून काम रखडले आहे.परिसरात 10 ते 15 खड्डे करण्यात आल्याने महिलांसह आबालवृद्धांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तोडकाम करतांना हलगर्जीपनाने संबंधित गुतीदाराने मंदिराच्या पायऱ्याही नष्ट केल्या आहेत.त्यामुळे गावकरी दोन महिन्यापासून मारुतीच्या दर्शना पासून वंचित आहेत.हे काम त्वरित सुरू करून संबंधित गुत्तेदाराला समज द्यावी व कायदेशीर कारवाई करावी,या मागणीसाठी मोगरा ग्रामस्थांच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर अरुण गोसावी,उद्धव धुमाळ, राम शिंदे, बाबासाहेब शिंदे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply