अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींनी मतदार नोंदणी करावी : अरूण राऊत

माजलगाव, दि.१५ (प्रतिनिधी):भारत निवडणुक आयोगाच्या नियमानुसार पात्र असणाऱ्या युवकांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष अरूण राउत यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२२ या अर्हतेवर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहेे. त्यानुसार दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीमध्ये अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींनी तसेच ज्यांनी अद्याप पर्यंत आपले नाव मतदार यादी मध्ये लावले नाही अथवा नावामध्ये ,फोटोमध्ये , इतर ठिकाणी स्थलांतरित झाले असता त्या ठिकाणी नाव लावायचे असेल अथवा पत्ता मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल , ज्या मतदाराचा मृत्यू झाला आहे अशा मयत व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र जोडून नाव वगळायचे असेल तर अशा सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाने प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्षांनी आपल्या प्रत्येक बूथप्रमुखांना नवीन पन्नास मतदान नोंदणी करून घ्यावी अशी सूचना द्यावी व बूथ प्रमुखांनी लावलेल्या नवीन नावाच्या नोंदणीची नोंद करून घ्यावी असे सांगितले आहे तरी सर्व बूथ प्रमुखांनी आपल्या प्रत्येक बूथ वर किमान ५० नवीन नावे समाविष्ट करून घ्यावीत त्यासाठी आपण आपल्या प्रभागातील नागरिकांशी संपर्क साधून ज्यांना नवीन नाव नोंदणी करायची आहे अशा नागरिकांशी संपर्क साधून नोंदणीसाठी लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे , कलर पासपोर्ट फोटो घेऊन मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करून घेवुन आपण त्या नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केले.

Leave a Reply