गोळ्या औषधावरील खर्च कमी करण्यासाठी ‘हा’ आहे उत्तम पर्याय…!

मुंबई – सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाजवी दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी जन औषधी केंद्रे म्हणून ओळखले जाणारे समर्पित आउटलेट्स उघडण्यात आले आहेत.

 

31 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशभरात 8819 जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना PMBJP च्या उत्पादनाच्या टोपलीमध्ये 1759 औषधे आणि 280 शस्त्रक्रिया वस्तूंचा समावेश आहे. ही योजना सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत सोसायट्यांद्वारे लागू केली जाते, उदाहरणार्थ फार्मा आणि मेडिकल ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) [पूर्वीचे ब्युरो ऑफ फार्मा PSUs ऑफ इंडिया (BPPI)].

 

लोकसंख्येच्या सर्व घटकांना विशेषत: गरीब आणि वंचितांना दर्जेदार औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, प्रसिद्धीद्वारे जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता निर्माण करणे, पीएमबीजेपी केंद्रे उघडण्यासाठी वैयक्तिक उद्योजकांना सहभागी करून रोजगार निर्मिती करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

Leave a Reply