अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे स्पष्टीकरण दिले आहे.मुंबई तक च्या चावडी कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी मुलाखत दिली या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांची साथ का सोडली याचे कारण सांगितले.
धनंजय मुंडे यांनी पुढे बोलताना सांगितले की गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडण्याचा निर्णय मी घेतला नाही 11 जानेवारी 2012 साली गोपीनाथ मुंडे यांनी भूमिका घेतली की माझ्या वडिलांचा आणि माझा त्यांच्याशी कुटुंबाशी आणि भाजपशी काहीही संबंध नाही मग मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटलो त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला मला आणि माझ्या वडिलांना बाजूला करण्यात आम्ही लायक होतो की नालायक या गोष्टी कारणीभूत होत्या पण अनेक वर्ष माझ्या वडिलांनी कष्ट घेतले वयाने मोठे असले तरी माझ्या वडिलांनी स्वर्गीय मुंडे साहेबांना कठीण काळात साथ दिली आमची कोणतीही राजकीय महत्त्वकांक्षा नव्हती पण प्रसंग आल्यानंतर मला हा कठोर निर्णय घ्यावा लागला असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दरम्यान आजही पंकजा मुंडे सोबत कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक वाद नसून त्यांच्यासोबत केवळ वैचारिक व राजकीय मतभेद असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.