भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्या प्रकरणी आ. प्रकाश सोळंकेंच्या पी.ए. ला अटक
माजलगाव: येथील भाजपा कार्यकर्ते तथा व्यापारी अशोक शेजुळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांचा पी. ए. महादेव सोळंके यास तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भाजपचे २०१९ चे विधानसभेचे उमेदवार रमेश आडसकर यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळख असलेले तथा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक शेजुळ यांच्यावर दि.७ मार्च रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात शेजुळ यांनी हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून झाला असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आ.प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जनाविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे आहे.
एक संशयित म्हणून त्यांनी चौकशी साठी महादेव सोळंके यांना केज येथे बोलावले होते. चौकशीत महादेव सोळंके यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढलून आले. त्यामुळे महादेव सोळंके यांना अटक करून माजलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून उद्या माजलगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान, या घटनेनंतर आ. प्रकाश सोळंकेंमुळे माजलगावच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागल्याची चर्चा जनतेत होत आहे. या अटकेनंतर जिल्हयात राजकीय खळबळ उडाली आहे.