आ.अमोल मिटकरीवर मनसेची टीका
मुंबई : गूगल वर “घासलेट चोर” असे सर्च केलं की या मटणकरी माकडाची कुंडली दिसते. स्वतःच्या पक्षाच्या अधिवेशनात ‘जाणते राजे’ हजर होणार त्या दिवशीच याचे सो कॉल्ड ‘दादा’ परदेशीवारीला गेले होते विसरला वाटतंय. पण, याला काळजी माझ्या नेत्याची. ते म्हणतात ना स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून. असो या औरंगजेबाच्या औलादीच्या तोंडून प्रभू श्रीरामाचे नाव निघाले हेच माझ्या नेत्याचे यश, अशी जोरदार टीका मनसेचे सरचिटणीस गजानन काळेंनी अमोल मिटकरींवर केली आहे.
नुकतेच गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी असं आवाहन केलं होतं. आज देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे. पण राज ठाकरे स्वत: विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली होती. याला मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
https://twitter.com/MeGajananKale/status/1641375049029496833?t=UnIk5Yw880kqkcOceeK__w&s=19
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात , हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा, असा निशाणा मिटकरींनी राज ठाकरेंवर साधला होता. अमोल मिटकरी आणि वाद हे समीकरणच बनले आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी ही त्यांचे नेहमीच खटके उडत असतात. मिटकरी यांनी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीही बरळू नये, अशी चर्चा होत आहे.