काल भारतीय जनता पक्षाची 1200 लोकांची जम्बो प्रदेश कार्यकारणी जाहीर झाली यात काही अनपेक्षित बदल करण्यात आले बीड जिल्ह्यातुन प्रदेश उपाध्यक्ष पदावर असणाऱ्या खा. प्रीतम मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्ष पुन्हा राखता आलेलं नसून त्यांच्या नावाचा उल्लेख कार्यकारणीतही नसल्याने खा. प्रीतम मुंडेंना का डावलण्यात आलं असा प्रश्न निर्माण होत आहे.
बीड जिल्ह्यातून प्रदेश कार्यकारणीवर सलग सातव्यांदा मा. आ. आर.टी. जिजा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सर्जेराव तांदळे, रमेश पोकळे, भीमराव धोंडे, डॉ. हजारी, रमेशआडसकर,लक्ष्मण जाधव यांची नावे यादीत दिसत असताना भाजपचे फायर ब्रँड नेते मोहन जगताप यांची प्रदेश कार्यकारणीवर निवड का होऊ शकली नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोहन जगतापांनी 2019 लोकसभे वेळेस भाजप मधे प्रवेश केला नंतर रमेश आडसकरांना उमेदवारी घोषित झाली त्यानंतर 2 वेळेस प्रदेश कार्यकारणी बदलण्यात आली परंतु या दोन्ही वेळेस मोहन जगतापांचा प्रदेश कार्यकारणीवर जाता आले नाही.
काय असते प्रदेश कार्यकारणी?
प्रदेश कार्यकारणी ही पक्षाची महत्वाची कार्यकारणी असून महत्वाच्या बैठका तसेच महत्वाच्या निर्णयाबाबत या कार्यकारिणीत चर्चा होत असते कार्यकारिणीच्या वर्षातून तीन वेळेस बैठका होत असतात विधानसभा लढवणारे बहुतांश उमेदवार प्रदेश कार्यकारणीवर जाण्यासाठी इच्छुक असतात कारण याच कार्यकारणीच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांसोबत जवळीक साधता येते.
मोहन जगताप यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली असून भाजपकडून ते इच्छुक आहेत. त्यांनी नुकतीच खरेदी विक्री व बाजार समितीच्या माध्यमातून प्रकाश सोळंकेना कडवी लढत देऊन एकप्रकारे स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे तसेच विधानसभेचे तिकीट त्यांना मिळणार अशी चर्चा असताना जिल्ह्यातील भाजप त्यांचे नाव प्रदेश कार्यकारणीवर का सुचवत नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
सुधारित यादीत मोहन जगतापांचे नाव?
प्रदेश भाजप लवकरच कार्यकारिणीची सुधारित यादी जाहीर करू शकते त्या यादीत मोहन जगताप यांच्या नावाचा समावेश असणार का?यावर माजलगावतील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.