मुंबई: काल मुंबई येथे भाजपा आमदार तथा प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भगवान गडाचे महंत ह भ प नामदेव महाराज शास्त्री उपस्थित होते या दोघांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी बोलताना नामदेव शास्त्री महाराजांनी श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण संस्थेचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या युती सरकारने भगवानगडासाठी सहा कोटी रुपये दिल्याने देवेंद्र फडणीस यांचे नामदेव शास्त्री यांनी आभार व्यक्त करून मध्यंतरी भगवान गडाचा विकास कार्यक्रम कशामुळे ठप्प झाला होता याचे कारण सर्वांना माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कौतुक करताना त्यांच्या कारकिर्दीत भगवान गडाला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले. भगवानगडावर सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती शास्त्रींनी सांगितली व त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी नामदेव शास्त्रीचे केलेले कौतुक व त्यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर बसने हे अनेकांना रुचले नसून कालपासून सोशल मीडियावर नामदेव शास्त्री व देवेंद्र फडनवीसां संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भगवान गडावरून पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बंद करणाऱ्या नामदेव शास्त्रीना या पुरस्कार सोहळ्या निमित्ताने देवेंद्र फडणीस व नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आल्याने भगवानगड राजकारण मुक्त झाला की पंकजा मुक्त असा सवाल मुंडे समर्थक मधून केला जात आहे.