हर्षवर्धन खांडेकर यास यावर्षीचा ‘विद्यार्थी वक्ता’ पुरस्कार

सिद्धेश्वर विद्यालयात डॉ. हेडगेवार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

माजलगाव दि.13 (प्रतिनिधी) :- येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजित डॉ हेडगेवार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत याच विद्यालयाच्या चि. हर्षवर्धन बंडूजी खांडेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. यावर्षीचा विद्यार्थी वक्ता पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण तथा समारोपीय सत्रात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना प्रशांत भानप यांनी सांगितले की, ही स्पर्धा आगामी वर्षांपासून विभागीय (मराठवाडा) पातळीवर घेतली जाणार आहे.

श्री सिद्धेश्वर विद्यालयाच्या वतीने मागच्या 23 वर्षांपासून डॉ. हेडगेवार जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड हे होते. तर व्यासपीठावर मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक विठ्ठलराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. हेडगेवार, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात झाले. यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला, निकालाचे वाचन स्पर्धा प्रमुख विशाल ठोसर यांनी केले.

सदरील स्पर्धेत प्रथम येण्याचा मान चि. हर्षवर्धन बंडूजी खांडेकर ( श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव ) द्वितीय – अष्टपुत्रे मल्हार गणेश ( श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय,अंबाजोगाई ) , तृतीय – चि. शेंडगे अजिंक्य रत्नेश्वर (महात्मा फुले माध्यमिक विद्यालय माजलगाव) , उत्तेजनार्थ – कु. मुंडे प्रतिक्षा विठ्ठल ( न्यू हायस्कूल कारी) यांनी मिळवला. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रकाश दुगड यांनी केले, प्रास्ताविक तथा अहवाल वाचन उपमुख्याध्यापक विठ्ठलराव काळे यांनी केले, सुत्रसंचालन श्रीमती स्मिता पांडे यांनी तर आभार पर्यवेक्षक कमलाकर झोडगे यांनी मानले.

यावर्षी झालेल्या स्पर्धेत ‘माणसाने माणसाशी माणसा सम वागणे’ व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सिंहावलोकन हे दोन विषय ठेवण्यात आले होते. जिल्ह्याभरातुन आलेल्या 26 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. परीक्षक म्हणून मल्हारी कुलकर्णी, प्रा.डॉ.रमेश गटकळ, सौ.लता जोशी यांनी काम पाहिले. चि. हर्षवर्धन यास सुनंदा खांडेकर-कोरडे व विशाल ठोसर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply