Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये; नमो शेतकरी योजनेचा हप्ता मंजूर

राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचे २००० रुपये बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महसन्मान निधी योजनेचे पैसेही मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामुळे येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुडीपाडवा म्हणजे मराठी माणसाचे नवीन वर्ष, त्याकाळातच शेतकऱ्यांना नव्या वर्षाची हि आर्थिक भेट ठरेल.

खरं तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Yojana ) सुरु केली. केंद्राप्रमाणेच या योजनेत सुद्धा ६००० रुपये दरवर्षी देण्यात येतात. आत्तापर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ७ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून सरकारने आता आठव्या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नमो शेतकरी महासंमं निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण २०२५ च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये वितरित करण्यात आले होते. त्यानंतर आठवा हप्ता कधी मिळणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला होता. परंतु वित्त विभागाने निधीच्या अडचणीमुळे नमोसाठी (Namo Shetkari Yojana ) निधी मंजूर केलेला नव्हता.

मात्र आता सरकारने या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. पीएम किसान योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात. कारण तीच यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळत असते.

Leave a Reply