माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दोनच तासात खाते वाटपही जाहीर झाले यात अर्थ व नियोजन खाते हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले असून लवकरच बीडच्या पालकमंत्री पदाचाही निर्णय होणार आहे.

संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीडच्या पालकमंत्रीपद अजित दादांनी स्वतःकडे घेतले यानंतर त्यांनी जिल्ह्यात विकास कामांचा धडाका लावला रेल्वे विमानतळ स्टेडियम सुसज्ज रस्ते तारांगण यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले परंतु त्यांच्या दुर्दैवी निधना नंतर आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार हा प्रश्न चर्चेत आला आहे. पंकजा मुंडेंकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहेत त्या राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री आहेत. 2014 ते 2019 या दरम्यान त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यकाळ त्यांचा राहिला. त्यांनीही अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली. पंकजा मुंडेंकडे बीडचे पालकमंत्री पद यावे यासाठी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत त्यांच्या नावाची चर्चाही राजकीय वर्तुळात जोरात आहे परंतु बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या कोट्यातील असल्याने याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष राहील बाबासाहेब पाटील यांचेही नाव चर्चेत असून नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदन समारंभाला त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले होते. सुनित्राताई पवार पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार का पंकजाताईंकडे पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार असल्याने समजते.