आज पाटण्यात विरोधी पक्षांची एकजूट दिसून येत आहे तब्बल 15 पक्षांची नेते एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा करीत आहेत परंतु एकत्र येणारे सर्व विरोधी पक्ष हे त्यांच्या मुलाबाळांच्या चिंतेने ग्रस्त असून मोदी लाट अशीच कायम राहिल्यास भविष्यात राजकीय क्षेत्रात आपल्या मुलाबाळांचे काय होईल याची चिंता या नेत्यांना लागली आहे.सोनिया गांधींना राहुल गांधींची चिंता आहे, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची चिंता आहे व शरद पवारांना सुप्रिया सुळे यांची चिंता असून यातूनच हे सर्व नेते पाटण्यात एकत्र आल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
स्वतःचे परिवार वाचवण्यासाठी परिवारवादी पक्ष एकत्र आले असून आता मेहबुबा मुफ्ती सोबत एकत्र बसण्यास उद्धव ठाकरेंना काही अडचण नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान या बैठकीत बि.आर.एस.वाय. एस. आर.काँग्रेस व जे. डी. एस. सहभागी झाले नाहीत