माजलगाव (प्रतिनिधी): पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन येथील पत्रकार परमेश्वर कल्याणराव सोळंके यांना ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन, पुणे या संघटनेकडून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त दिला जाणारा समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन ही संस्था सामजिक, आर्थिक,राजनैतिक व न्याय आदी क्षेत्रात काम करते. सदर संस्थेच्या च्या वतीने प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षीच्या समाज रत्न पुरस्कारासाठी पत्रकार परमेश्वर कल्याणराव सोळंके यांची निवड करण्यात आली आहे. परमेश्वर सोळंके हे अनेक वर्षांपासून निर्भीड, निस्पृह पत्रकारिता करत आहेत.पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करून वंचित, उपेक्षित, पीडित लोकांचा आवाज बुलंद करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन ने यंदाचा समाज रत्न पुरस्कार परमेश्वर सोळंके यांना जाहीर केला आहे.
दि.१० डिसेंबर २०२२ रोजी पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड (पुणे) येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी इ.झेड. खोब्रागडे हे उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी न्यायाधीश बी जी कोळसे, समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ, माजी मंत्री आ. बच्चू कडू, आ. लक्ष्मण जगताप,आ.अण्णासाहेब बनसोडे, डॉ. बबन जोगदंड,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, स्वागताध्यक्ष कैलास बनसोडे, राहूल भातुकले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाज रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल परमेश्वर सोळंके यांचे राजकीय,पत्रकार, डॉक्टर, वकील ,शिक्षक,समाजसेवक, मिञ परिवार व सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. महा जागरण परिवाराच्या वतीने परमेश्वर सोळंके यांचे हार्दिक अभिनंदन.