पुणे महापालिकेत नोकर भरती सुरू; अर्ज करण्याची मुदत घ्या जाणून
PMC Job 2023: पुणे: महापालिकेतर्फे ‘वर्ग १’, ‘वर्ग २’ आणि ‘वर्ग ३’मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेश पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील हा दुसरा टप्पा आहे.पहिल्या टप्प्यात ४४८ जागा भरण्यात आलेल्या आहेत. या भरतीत सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक आदी पदे भरण्यात आली. ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन’मार्फत (आयबीपीएस) ही परीक्षा घेण्यात आली होती.
महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या टप्प्याच्या तुलनेत या टप्प्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.अर्ज करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत.जाहिरात क्रमांक 1/ 1362 नुसार वर्ग एक मधील 8 पदे, वर्ग दोन मधील 23 पदे व वर्ग 3 मधील 289 पदे अशा एकूण 320 पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
महापालिकेची बिंदू नामावली (रोस्टर) अद्ययावत केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत. क्ष-किरणतज्ञ, रेडिओलॉजिस्ट/ सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक प्राणी संग्रहालय, उपउद्यान अधीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, वाहन निरीक्षक, औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक, अग्निशामक/ फायरमन आदी प्रकारची पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. बेरोजगार तरुणांनी ही संधी दवडू नये.या भरतीसाठी शनिवारपर्यंत महापालिकेकडे चार हजारांहून अधिक अर्ज आले.
असे आहे वेळापत्रक
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 28/03/2013 वेळ 23.59 पर्यंत
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: 28/03/ 2023
- परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या 7 दिवस अगोदर
- ऑनलाइन परीक्षेचा दिनांक: एप्रिल-मे 2023 संभाव्य
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक: https://pmc.gov.in/mr/recruitments