Poisonous Liquor Case: बिहारमध्‍ये विषारी दारुचे २४ बळी, मंत्र्यांचा राज्‍य सरकारला घरचा आहेर

[ad_1]

बेतिया/गोपालगंज : ऑनलाईन

बिहारमध्‍ये विषारी दारु पिल्‍याने ( Poisonous Liquor Case) मृत्‍यूचा आकडा २४वर पोहचला आहे. पश्‍चिम चंपारण जिल्‍ह्याचे मुख्‍यालय असणार्‍या बेतियातील तेलहुआ गावात बुधवारी आठ जणांचा विषारी दारुने मृत्‍यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर होती. शुक्रवारी मृतांची संख्‍या २४ वर गेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कारवाई केवळ दीनदुबळ्यांवरच होत : मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर

विषारु दारुमुळे ( Poisonous Liquor Case) २४ जणांचा मृत्‍यू झाल्‍याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी सत्ताधारी जनता दल संयुक्‍त आणि भाजपवर निशाणा साधला होता. तसेच  सरकारमधील मंत्री जनक चमार यांनीही विषारी दारु हे कारण सांगितले जात असले तरी २४ जणांच्‍या मृत्‍यू होण्‍यामागे मोठे कारस्‍थान असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. विषारी दारु पिल्‍याने मृत्‍युमुखी पडलेले सर्वजण गरीब आहेत. कारवाई केवळ दीनदुबळ्यांवरच होत आहे. अशा कारवाईमुळे गरीब नागरिक मृत्‍युमुखी पडतात. मागील काही दिवासांपासून गुंडावर पोलिसांचा वचकच राहिलेला नाही, असेही जनक चमार यांनी म्‍हटलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply