पुनंदगाव येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा: ग्रामस्थांची मागणी 

विहीर खोदकामा करीता नाहरकत घेतली नसल्याने पाटबंधारे विभागाने काढली ग्रामपंचायतला नोटीस

बीड प्रतिनिधी: माजलगाव तालुक्यातील पुनंदगाव येथील जलजिवन पाणीपुरवठा योजनेच्या जिल्हापिरषद शाळेमध्ये पाण्याची टाकीचे बांधकाम करण्यात येऊ नये व पाईपलाईचे झालेले बोगस कामाची चौकशी पुर्ण झाल्याशिवाय बिले अदा न करणे बाबत ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

मौजे पुनंदगाव येथील जिल्हापरिषद शाळेचे 1 एकर जागा हि पुनर्वसन अधिकारी यांनी ही जागा शाळेसाठी राखीव ठेवलेली आहे. शाळेच्या जागेत जलकुंभ बांधकाम साठी सध्या खोदकाम सुरू आहे. तरी येथे कुठले ही बांधकाम करण्यात येऊ नये कारण शाळेत लहान लहान मुले मुली शाळेत येतात काही दुर्घटना घडल्यास कोण जिम्मेदार असेल, असे नागरिकांतून चर्चा होत आहे.

 

सदर योजनेतुन बोगस काम चालु आहे. संबंधीत गुत्तेदारांची इस्टीमेंट प्रमाणे पाईप लाईनचे योजनेची खोदकाम केलेले नाही.काम बोगस केल्यामुळे व बोगस साहित्य वापरल्याने सदर योजनेला ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय पुनंदगाव व काही दलाल आपसात संगणमत करुन नमुद योजनेच्या कामाकरीता आलेला निधी थातुरमातुर कामे करुन व बोगस कागदपत्रे तयार करुन शासनाचा निधी बेकायदेशिररित्या हडप करीत असल्याची तक्रार दि. 12/09/2022 व दि. 16/09/2022 व 31/10/ 2022 रोजी बोगस कामे होत असल्याची तक्रार मा. मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे मा. जिल्हाधिकारी साहेबांनी ३५० कामाना जिल्हयांमध्ये स्थगिती दिली असताना ही संबंधीत ग्रामसेवक व मागील माजी सरपंच व गुतेदार यांनी जुन्या तारीख दाखवत बोगस ठराव मंजूरी दिली आहे तरी योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी गुत्तेदार यांचे नाव काळयायांदीत टाकुन यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच ॲड गौतम किसन मिसाळ व सिध्देश्वर भानुदास गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply