राहुल गांधींचा स्मृती इराणी यांना फ्लाईंग किस स्मृती इराणी यांनी राहुल गांधीला…..

कालपासून संसदेत अविश्वास ठरावावर जोरदार चर्चा सुरू आहे आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत जोरदार भाषण केले.त्यांनी मणिपूर मधे केंद्र सरकारने भारत मातेची हत्या केल्याचा आरोप करताच संसदेत भाजपच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागतं होता दरम्यान राहुल गांधींचे भाषण संपताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली या वेळी राहुल गांधींनी भाषण करत असलेल्या स्मृती इराणी यांना फ्लाईंग किस करत सभागृहातून बाहेर पडले.राहूल गांधींचा फ्लाईंग किस पाहून स्मृती इराणी यांना प्रचंड राग आला त्यांनी भाषणात राहुल गांधींच्या या कृतीचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. स्मृती इराणी यांच्या सोबत भाजपच्या महिला खासदारांनीही राहुल गांधींच्या फ्लाईंग किसची तक्रार केली आहे.

 

Leave a Reply