RSS Vijyadashmi Utsav – RSS chief Mohan Bhagavt Speech at Nagpur

[ad_1]

नागपूर : RSS Vijyadashmi Utsav : भारतीय परंपरेवर आणि मूल्यांवर आक्रमण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही लोक एकत्र आले आहेत. भेदरहित समाज स्वातंत्र्य टिकवेल, असे वक्तव्य संघाच्या विजयादशमी उत्सवात (Vijyadashmi Utsav) सरसंघचालक मोहन भागवत ( RSS chief Mohan Bhagwat ) यांनी केले. यावेळी ड्रग्ज, व्यसनाबाबत भागवतांनी चिंता व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी राजकीय पक्षांनाही फटकारले. पक्ष एकमेकांविरुद्ध असतील तर ठीक आहे. पण सरकारे देखील एकमेकांच्या विरोधात उभी दिसत आहेत, हे चित्र बदलायला हवे, असे ते म्हणाले. (RSS Vijyadashmi Utsav – RSS chief Mohan Bhagwat Speech at Nagpur)

समाज भेदरहित आणि समताधिष्ठित असावा

आरएसएसचा विजयादशमी उत्सव ( RSS Vijyadashmi Utsav) सुरू झाला. रेशीमबाग मैदानात संघाचा विजयादशमी उत्सव सुरुवात झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. कोरोनामुळे यावर्षीही विजयादशमी उत्सवाचा मुख्य सोहळा मर्यादीत स्वयंसेवकाच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला चांगलेच फटकारले. ते म्हणाले, हिंदू समाज विखुरलेला राहील यासाठी बराच प्रयत्न सुरू आहे. परस्परातील भेद मिटविण्यासाठी समाजाला जोडणाऱ्या भाषेची आज गरज आहे. भारताने गमावलेले अखंडत्व प्राप्त करायला हवे. त्यासाठी आपला समाज भेदरहित आणि समताधिष्ठित असण्याची गरज आहे. देशाच्या फाळणीची वेदना अजूनही कोणी विसरू शकलेले नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

‘कोरोनाच्या संकटाने देश घाबरलेला नाही’

देशातील दोन राज्यांचे पोलीस एकमेकांवर गोळ्या चालवतात. आपण एका देशाचे आहोत का, हा प्रश्न अशावेळी पडतो. पक्ष एकमेकांविरुद्ध असतील तर ठीक आहे. पण सरकारं देखील एकमेकांच्या विरोधात उभी दिसताहेत. हे चित्र बदलायला हवे. आज सरकार काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात यश येईलही. पण आपलीही एक जबाबदारी आहे. ती पाळली तर सरकारशिवाय अनेक गोष्टी करता येऊ शकतात. कोरोनाच्या लढ्यात आपला देश जगात सगळ्यात पुढे आहे. कोरोनाच्या संकटाने देश घाबरलेला नाही. आर्थिक क्षेत्रात पुन्हा तेजी आली आहे, असे दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहिले पाहिजे. ही लाट येणार नाही, अशी आशा करु या. पण त्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.  

लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढतेय

ओटीटी प्लॅटफॉर्म, बिटकॉईन, अमली पदार्थांचे वाढलेला वापर यावर कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाही. सर्व स्तरातील लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले, अशी चिंता यावेळी मोहन भागवत यांनी केली. व्यसनाला सीमापार असलेले देश प्रोत्साहन देत आहेत. तसेच लहान मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काय दाखविले जात आहे, यावर विचार करण्याची गरज आहे, अशी चिंता मोहन भागवत यांनी व्यक्त केली. त्याचवेळी ते म्हणाले, देशात एक प्रकारचा उत्साह आहे. क्रीडा क्षेत्रातील भारताच्या यशातून हे दिसून आले आहे. त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.

तालिबानपासून सावध राहायला हवे

यावेळी त्यांनी अनुच्छेद 370 वर भाष्य केले. अनुच्छेद 370 रद्द केले गेल्यामुळं जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरिक हे भारतीय आहेत, भारताचे एक अंग आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण करण्याची गरज आहे, मोहन भागवत म्हणाले. आपल्याला तालिबानपासून सावध राहायला हवे. तालिबान कदाचित बदलले असेल, पण चीन आणि पाकिस्तान बदललंय का, असा त्यांनी सवाल उपस्थित केला.

‘लोकसंख्या नियंत्रणाचा पुनर्विचार करावा’

मोहन भागवत म्हणाले, ‘लोकसंख्या धोरणाचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. पुढच्या 50 वर्षांपर्यंत विचार केल्यानंतर एक धोरण बनवले पाहिजे आणि ते धोरण सर्वांवर समानतेने लागू केले जावे, लोकसंख्येचा असमतोल हा देश आणि जगात एक समस्या बनत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply