पोलादी पुरुषाच्या भूमिने भारतमातेला दिलेला आधुनिक पोलादीपुरुष…

देशाचे गृहमंत्री तथा पहिले सहकार मंत्री #अमितभाई_शहा हे देशाला लाभलेले आधुनिक पोलादी पुरुषच आहेत.

गृहमंत्री कसा असावा याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण त्यांनी जगा समोर ठेवले आहे.कणखर भूमिका आणि देशहिताच्या बाबतीत किंचित ही तडजोड न करणे, हे त्यांची कार्यशैली. त्यांनी अशक्यप्राय वाटणारे कलम 370 रद्द करून जम्मु काश्मीर मधील फुटीरवादी-देशद्रोही शक्तींना सुतासारखे सरळ केले.नक्षलवादी कारवाया, आतंकवादी हमले, दंगली, आंदोलनाच्या नावाखाली होणारी जाळपोळ आटोक्यात आणली.देशहिताच्या मुद्द्यावर संसदेत विरोधकांची पिसे काढतांना त्यांचा तो रुद्रावतार पाहिला की, आपले मत सार्थकी लागल्याची जाणीव होते. विरोधकांतील तथाकथित एकही संसदरत्न त्यांच्यासमोर टिकू शकत नाही, हे अनेकदा देशाने पाहिलेय. गुजरात दंगल प्रकरणी काँग्रेस ने सत्तेचा दुरुपयोग करीत खोटेनाटे आरोप करून नाना प्रकारच्या चौकशा, आयोग त्यांच्या मागे लावले.सर्व केंद्रीय संस्था हात धुवून मागे लागल्या होत्या.अक्षरशः त्यांना राजकारणातून संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण संघाच्या मुशीतून तयार झालेले हे अजब रसायन त्यातूनही तावून सुलाखून बाहेर पडले.एकदाही ते चौकशी ला घाबरले नाहीत की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या प्रमाणे फरार ही झाले नाहीत. या बाबीचा त्यांनी कधी महाराष्ट्राच्या काका-पुतण्या प्रमाणे सहानुभूती मिळवण्यासाठी वापर केला नाही.असो! काँग्रेस च्या बोटचेप्या भूमिकेने मग्रूर झालेले यु. पी. बिहार, पश्चिम बंगाल व इतर अनेक राज्यातील बाहुबली नेते कम माफिया डॉन त्यांच्या दराऱ्याने #शेपूट घालून बसलेत.सहकारच्या नावाखाली स्वाहाकार करून स्वतः चे उखळ पांढरे करून घेतलेल्या सहकार सम्राटांच्या वर्मी घाव घालून त्यांना पुरते घायाळ करण्याचे काम ही अमितभाईंच्याच खात्यावर जमा झालेय.पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत सावली प्रमाणे साथ देतात. मोदींच्या प्रत्येक निर्णयात खंबीर साथ देणारे #लक्ष्मणच! ज्यांना भक्त मंडळी लाडाने #मोटाभाई म्हणतात असे माननीय अमितभाई शहा यांना #जन्मदिनाच्या #हार्दिक #शुभेच्छा… भारत देशाला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी आपणास आरोग्यमय #उदंड #आयुष्य #लाभो ही प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना
-अशोक दोडताले

2 thoughts on “पोलादी पुरुषाच्या भूमिने भारतमातेला दिलेला आधुनिक पोलादीपुरुष…

Leave a Reply