Rule changes : बोनस, पगार लवकर आला म्हणून हरकू नका, उद्यापासून खिशाला भगदाड पडणार !

[ad_1]

बोनसने आणि वेळेआधीच झालेल्या पगाराने गरम झालेला खिसा सांभाळा. उद्या १ नोव्हेंबरपासून खिशाला भगदाड पडणार आहे. अनेक बदल (Rule changes) उद्यापासून अंमलात येत आहेत. बँकेतून स्वत:चे पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठीही पैसे मोजावे लागतील. घरगुती गॅस सिलिंडर कडाडेल. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलणार असल्याने आधीचे बुकींग अडचणीत येईल. 1 नोव्हेंबरपासून

Rule changes : होणार्‍या बदलांवर ही एक नजर

बँकांच्या व्यवहाराचा फटका बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क आकारणार. बँक ऑफ बडोदाने या नियमाची
अंमलबजावणी सुरू केली आहे. विहीत मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल.

कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागणार.

बचत खात्यात महिन्यातून केवळ 3 वेळा पैसे जमा करण्यावर शुल्क नसेल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 40 रुपये शुल्क आकारणी.

Rule changes : सिलिंडर महागणार

1 नोव्हेंबरपासून एलपीजी म्हणजेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एलपीजी सिलिंडरच्या विक्रीत होत असलेल्या तोट्याच्या पार्श्‍वभूमीवर गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली जाऊ शकते. गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचवण्यासाठीच्या प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. बुकिंग केल्यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी डिलिव्हरी बॉयला दिल्याशिवाय गॅस सिलिंडर मिळणार नाही. ग्राहकांना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागणार त्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही

Rule changes : जनधन खातेधारकांना काहीसा दिलासा

जनधन खातेधारकांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. त्यांना खात्यात पैसे जमा करण्यावर शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु, पैसे काढण्यासाठीच्या प्रत्येक व्यवहारावर 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Rule changes : ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

1 नोव्हेंबरपासून ट्रेनच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. 1 ऑक्टोबरपासूनच हे बदल होणार होते. परंतु, काही कारणास्तव 1 नोव्हेंबरपासून हे बदल होणार आहेत. 13 हजार पॅसेंजर ट्रेन आणि 7 मालगाड्या तसेच 30 राजधानी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत. त्यामुळे ज्यांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे त्यांचे नियोजन कोलमडणार आहे. ट्रेनच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांना पुढील नियोजन करावे लागेल.

हे ही वाचलं का?

[ad_2]

Source link

Leave a Reply