नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे खास वैशिष्ट्ये

समृद्धी महामार्गाचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

 

मुंबई: शिंदे फडणीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न असलेला राज्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला समृध्दी महामार्ग चे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत चला तर मग जाणून घेऊया या महामार्गाची खास वैशिष्ट्ये…

default

राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर २५ इंटरचेंज असून महामार्गालगत १८ नवनगरे असतील. महामार्गावर ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचे पूल ३२ असून लहान पुलांची संख्या ३१७ आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर ला जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची एकूण किंमत ५५ हजार ३३५ कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गावर प्राथमिक टप्प्यात १३८.४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रस्तावित आहे.

समृद्धी महामार्गावर जेवढा प्रवास तेवढाच टोल भरण्याची सुविधा आहे. नागपूर-शिर्डी मार्गिकेवर फक्त वायफळ (ता.हिंगणा,जि.नागपूर) येथे पथकर नाका आहे, इतर इंटरचेंजवर १८ नाके आहेत. टोल भरण्यासाठी फास्ट टॅग, कार्ड, वॉलेट, कॅश व ऑनलाईन असे पर्याय आहेत.

समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण १०० मार्ग असून त्यापैकी ८ उन्नत मार्ग, तर ९२ भुयारी मार्ग आहेत. वन्यजीवांच्या वावरासाठी ठिकठिकाणी ध्वनिरोधक यंत्रणा बसविली आहे. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची उंची वाढविली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने व १३ गस्त वाहने उपलब्ध राहतील.

समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी पायाभूत समितीच्या ३० नोव्हेंबर २०१५ च्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून घोषित करण्यासह महामार्गासाठी ग्रीनफिल्ड संरेखन निश्चित करण्यास मान्यता मिळाली.

समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्कासाठी १५ ठिकाणी चौक्या उभारण्यात येणार आहेत. वाहनांचा बिघाड वा अपघात झाल्यास हेल्पलाईन क्र. १८०० २३३ २२३३ आणि ८१८१८१८१५५ आणि वैद्यकीय सेवांसाठी १०८ क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply