खबरदार! ‘तुका म्हणे’ असा शब्द प्रयोग कराल तर…

श्रीक्षेत्र देहू, दी.४ (प्रतिनिधी): नूतन वर्षाच्या शभेच्छा देताना काही महाभाग अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा देतात. परंतु, या वर्षा पासून छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाचे विडंबन केलं तर त्यांच्यावर देहू संस्थान कडक कारवाई करेल, असा इशारा संस्थान चे वतिने देण्यात आला आहे.

इंग्रजी नूतन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नूतन वर्ष साजरा करत असताना अनेक तरुण आपल्या मित्रांना, आप्तेष्टांना शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ असा शब्द प्रयोग करून अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा संदेश तयार करतात. पण या वर्षी पासून हा शब्द प्रयोग महागात पडू शकतो. कारण, यावर देहू संस्थानने आक्षेप घेतला आहे. नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्द प्रयोग केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे ह्यांनी दिला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विडंबन करणारे शब्द प्रयोग खपवून घेतले जाणार नाहीत, असेही नितीन महाराज मोरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply