[ad_1]
मुंबई : कच्चा कांदा किंवा लसूण खाल्ल्यानंतर तोंडातून विचित्र असा वास येऊ लागतो. ही समस्या अनेकांनाच भेडसावते. त्यातही कांदा आणि लसूण खाल्ल्यानंतर कुठे बाहेर जायची वेळ आली की, अनेकांच्याच कपाळावर आठ्या येतात. चारचौघात बोलताना तोंडाचा वास आपली प्रतिमा तर मलिन करणार नाही, अशीच भीती अनेकांना वाटत असते. असं होऊ नये, यासाठी काही टीप्सचा नक्की अवलंब करा…
कोमट पाणी प्या
कांदा आणि लसुणाच्या दुर्गंधीपासून मोकळीक मिळवण्यासाठी कोमट पाणी प्या.
जेवणानंतर गरम-कोमट पाणी प्यायल्यानं अन्नपचनासही मदत होते. शिवाय तोंडातील बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्सपासून सुटका मिळते.
लिंबू पाणी
जेवणानंतर लिंबू पाणी पिणं फायद्याचं असतं. तोंडातील दुर्गंधी यामुळं दूर होते.
लिंबामध्ये असणारं सायट्रीक अॅसिड आणि रोगप्रतिकारक तत्त्व कांदा- लसुणाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतं.
त्यामुळं तोंडाला वास येत असल्याच गरम पाण्यात लिंबू पिळून त्यानं गुळणी करावी, याचा फायदा होईल.
बडीशेप आणि वेलची
जेवणानंतर किंवा कोणत्याही पदार्थाच्या सेवनानंतर बडीशेप आणि वेलची खाल्ल्यास खाल्लेले पदार्थ पचवण्यास मदत होते.
गरम- कोमट पाण्यातून या पदार्थांचं सेवन केल्यास ही नियमितता तोंडाचा वास घालवण्यात फायद्याची ठरते.
दूध
कांदा- लसूणाचं सेवन केल्यानंतर 20 मिनिटांनी दूध प्यायल्यास ही दुर्गंधी दूर होते.
सफरचंद
सफरचंदामध्ये असणारे एंझाईम्स कांदा- लसुणातील सल्फर कंपाऊंडची साखळी तोडतात. ज्यामुळं तोंडाची दुर्गंधी दूर होते.
पुदिना
पुदिन्यामध्ये असणारी तत्वं आणि त्यातून निघणाऱ्या घटकांचाही तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदा होतो.
ग्रीन टी
ग्रीन टीचे फायदे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. यामध्ये असणारी तत्त्वं पचनसंस्था सुधारण्यासही मदत करतात.
[ad_2]
Source link