मुंबई (प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील सुपुत्र आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चि. तपेश ओमप्रकाश शेटे या बाल क्रिकेटपटूची आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशा बद्दल तपेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेत खेळण्यासाठी तो काल येथील विमानतळावरून उदयपूरला रवाना झाला.आरोग्य सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्य उभे करणारे देवदूत डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा सुपुत्र असलेल्या तपेशने बाल वयातच क्रिकेटमध्ये चांगले यश मिळवले आहे. त्याचे वय सध्या ११ वर्ष असूनही त्याची निवड १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघामध्ये झाली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमी मध्ये तो सध्या प्रशिक्षण घेत असून खुद्द सचिन तेंडुलकर यांचे सुद्धा तपेशला मार्गदर्शन आणि सहवास लाभत आहे.आता याच अकॅडमीच्या वतीने ४ वनडे मॅचेस व १ टी ट्वेंटी असा तब्बल सहा दिवसाचा त्याचा पहिला आंतरराज्य क्रिकेट दौरा उदयपूर (राजस्थान) येथे होत आहे. या स्पर्धेसाठी तो काल आपल्या संघातील खेळाडूंसह उदयपूरला रवाना झाला. यावेळी त्याचे वडील देवदूत डॉ.ओमप्रकाश शेटे तपेश व टीमला निरोप देण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. मुलाच्या बाल वयातील कर्तुत्वाचा गौरव करताना डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी ‘गोरगरिबांच्या रुग्णसेवेचे पुण्य कामे आले’ अशी भावना व्यक्त केली.
Maha jagran news महा जागरण