मुंबई : भारत आणि कॅनडा यांच्यात राजकीय तणाव वाढत असून त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही होताना दिसत आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव वाढत आहे, तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजार सतत कोसळत आहे. बुधवार मागील व्यवहाराच्या दिवशी मोठी घसरण पाहिल्यानंतर गुरुवारही शेअर बाजारासाठी वाईट दिवस ठरत आहे. दुपारी १.३० पर्यंत सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी देखील १६० हून अधिक अंकांनी गडगडला.
या घसरणीमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे १.१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स ८०० अंक कोसळला

महिंद्रांचा मोठा निणर्य
भारत आणि कॅनडा यांच्यातील वादाचे पडसाद व्यवसायावरही दिसून येत आहेत. दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्राने एक मोठी घोषणा केली आणि कंपनीने गुरुवारी सांगितले की त्यांची कॅनडा-आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कार्य थांबवले आहे. मुंबईस्थित ऑटोमेकरकडे कंपनीत ११.१८% हिस्सा होता, ज्यांनी ऑपरेशन्स ऐच्छिक बंद करण्यासाठी अर्ज केला होता.

महिंद्रा कंपनीने काय सांगितले
महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून २० सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे. यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केले आणि ती यापुढे २० सप्टेंबर २०२३ पासून कंपनीची सहयोगी नाही.”

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील वातावरण तापलं, परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीयांना महत्त्वाची सूचना
M&M शेअर्सची स्थिती
कंपनीने कॅनडात उचललेल्या पावलानंतर देशांतर्गत बाजारात महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स आज गुरुवारी तीन टक्केपेक्षा जास्त घसरले आणि १,५८४.८५ रुपयांवर आले. तथापि, या वर्षी स्टॉकने YTD २५% आणि गेल्या एका वर्षात २१.२८% वाढ नोंदवली असून गेल्या पाच वर्षांत ६५% वाढ झाली आहे.

मुक्त व्यापार करार रद्द, भारत-कॅनडा संबंधांत वितुष्ट, पुढे काय परिणाम होणार?

गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा
शेअर बाजारातील घसरणीच्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी भांडवल बुडाले. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल, दोन दिवसांपूर्वी ३२३.०१ लाख कोटी रुपये होते, जे बुधवारी ३२०.५१ लाख कोटी आणि गुरुवारी नोंदवलेल्या घसरणीनंतर ३१९.४१ कोटी रुपयांवर घसरले आहे. यानुसार अवघ्या दोन दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ३.६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply