यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली.जूनच्या पहिला आठवड्यात मान्सूनचा प्रवास चक्रीवादळामुळे खंडित झाला संपूर्ण जून चा महिना संपत आला तरी पावसाचे आगमन झाले नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे मृगात होणाऱ्या पेरण्यांचा मुहूर्त हुकला अनेक ठिकाणी दुबार,तीबार पेरणी करावी लागणार असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
परंतु आज सकाळपासून विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले आहे यवतमाळ, वर्धा, अमरावती,भंडारा सहित नागपूरमधे पावसाची चांगलीच बॅटिंग सुरू आहे. विदर्भात पावसाचे आगमन झाले असले तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सहित उत्तर महाराष्ट्राला अजूनही पावसाची प्रतीक्षा असून आगामी 72 तासात मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान खात्याने केला आहे.