प्रकाश सोळंकेंचं राजकीय पानिपत करण्याची धमक माझ्यात: माजी आ. होके पाटील

माजी आ. राधाकृष्ण होके पाटील यांच्यावरील एकेरी टीका माजलगावकरांना रुचली नाही

माजलगाव: मी कठोर शब्दात प्रत्युत्तर देऊ शकतो परंतु माझी संस्कृती व संस्कार मला खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यापासून परावृत्त करतात. मी निष्क्रिय असतो तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत खा. शरद पवारांना घेऊन माझ्या घरी का आलात?आजही माझ्यात तुमचं पानिपत करण्याची धमक असल्याचे प्रतिपादन मा. आ. राधाकृष्ण आण्णा होके पाटील यांनी केले.

 

काल खरेदी विक्री संघाचा निकाल घोषित झाल्यावर आ. प्रकाश सोळंके कमालीचे आक्रमक झाले होते त्यांनी मा. आ. राधाकृष्ण आण्णा होके पाटील यांच्यावर एकेरी शब्दात टीकास्त्र सोडून होकेंचा निष्क्रिय आमदार असा उल्लेख केला तसेच मा. आ. होके पाटील हे कुठल्याच मुद्यावर ठाम राहतं नसल्याचे सांगितले तसेच मोहन जगताप हे मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात दारू पिऊन आल्याच्याही आरोप करून रात्री मोहन जगतापांना फोन लावताना विचार करावा लागतो, असे सांगितले.

 

तसेच मोहन जगताप व नितीन नाईकनवरे हे दोघेजण दरोडेखोर व चोट्टे असल्याचा घणाघात आ. सोळंकेनी केला. आ. सोळंकेंच्या या आक्रमक पावित्र्यनंतर अद्यापी जगताप,नाईकनवरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. परंतु मा आ. होकेंनी आज पत्रकार परिषद घेऊन आ. सोळंके वर प्रतिहल्ला केला तसेच त्यांचा इतिहास काढताना मी निष्क्रिय असतो तर माझ्याकडे खा.पवारांना घेऊन का आलात असा सोळंकेना प्रतिप्रश्नही करून तुमचे राजकीय पानिपत करण्याची ताकद अजूनही असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आ.सोळंकेनी मोहन जगताप यांच्यावर दारू पिऊन जयंती सणारंभात आलेल्या टीकेला जगताप कसे प्रत्युत्तर देतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आ. सोळंकें मुळे माजलगावच्या राजकीय संस्कृतीला गालबोट…?

मागील काही दिवसापासून आमदार प्रकाश सोळंके राजकीय दृष्ट्या कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय संस्कृतीला न शोभणारी एकेरी, खाजगी टीका त्यांच्याकडून विरोधकावर होत आहे. भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ही त्यांचे नाव जोडले गेले आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव चे राजकारण सभ्य आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जात होते.

Leave a Reply