महाविकास आघाडी आज आहे, उद्याचं सांगता येत नाही: शरद पवार

काँग्रेस, ठाकरे गटात खळबळ!

Maha vikas aaghadi

मुंबई: महाविकास आघाडी आज आहे, उद्याचा सांगता येत नाही! असा सूचक इशारा महाविकास आघाडीचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे शरद पवारांनी (Sharad Pawar)दिला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसमध्ये मात्र खळबळ माजली आहे.

 

पत्रकारांशी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की,यापुढेही सोबत काम करायची इच्छा आहे, परंतु त्या बाबतीत आज काय सांगता येत नाही. जागावाटप बाकी आहे, जागा वाटपात इशू येऊ शकतो. राज्याच्या राजकारणात अधून मधून विरोधी पक्ष नेते व पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या बंडखोरी बाबत चर्चा होत असतात. शिंदे फडणवीस सरकारला धोका निर्माण झालाच तर शरद पवार हे अजित पवारांना पुढे करून भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. शरद पवारांची अशी वक्तव्य म्हणजे काँग्रेस व उद्धव ठाकरेंना जागा वाटप करतांना दबावात ठेवण्यासाठी आहेत, असे ही काहीचे म्हणणे आहे.

दरम्यान ,शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,महाविकास आघाडी फुटणार की अभेद्य राहणार याविषयी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत. #महा_जागरण #महा जागरण न्यूज पोर्टल #mahajagran

Leave a Reply