अखिलेश यादव यांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय

[ad_1]

लखनौ ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वतः निवडणूक न लढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. सध्या अखिलेश हे आझमगड येथून समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. त्यांना पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मानले जात होते.

परंतु, त्यांनी विधानसभा न लढविण्याचा निर्णय घोषित केला आहे. ते म्हणाले की, विधानसभेसाठी सप आणि राष्ट्रीय लोक दलाची युती झाली आहे. लवकरच जागावाटप ठरेल. काका शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहियावादीसोबत युती करण्यात मला काहीही अडचण नाही, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply