एलओसीवर रहस्यमय स्फोट; लष्करी अधिकार्‍यासह 2 शहीद

[ad_1]

जम्मू; अनिल साक्षी : पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरातील कलाल सेक्टरमधील एलओसी वर (नियंत्रण रेषा) शनिवारी रहस्यमयरीत्या झालेल्या शक्तिशाली स्फोटात भारतीय लष्करातील एक अधिकारी व एक जवान शहीद झाले. स्फोटात अन्य एक अधिकारी व 3 जवान असे 4 जण जखमी झाले असून, चौघे उधमपूर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल आहेत.

स्फोटात जखमी झालेल्या सर्व 6 जणांना आधी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. वाटेतच दोन जण मरण पावले. उर्वरित चौघांवर या नजीकच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात येऊन नंतर त्यांना उधमपुरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्फोट नेमका कशाचा, कशामुळे झाला व कुणी केला, त्याचा पान 2 वर

तपास सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शनिवारच्या स्फोटात शहीद झालेल्यांची ओळख पटली असून, लेफ्टनंट ऋषी कुमार व जवान मनजित सिंग अशी त्यांची नावे आहेत. लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर जवान मनजित सिंग हे पंजाबातील भटिंडा जिल्ह्यातील सिरवेवालाचे रहिवासी होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply