जम्मू आणि काश्मीर : पुलवामात ३ दहशतवाद्यांना अटक

 

पुलवामा (जम्मू- काश्मीर); ऑनलाईन : जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा पोलिसांच्या ५५ आरआर आणि १८२/१८३ सीआरपीएफ या तुकडीने जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. हे दहशतवादी जिल्ह्यात रसद परवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान सुरक्षा जवानांनी त्याच्याकडून १ एके रायफल, ३ मॅगझिन आणि ६९ एके राऊंड असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

शोपियांमध्ये एक दहशतवादी ठार

यापूर्वी जम्मू- काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील तुर्कवांगम भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम राबविण्यात आली. याच दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांच्यात चकमकीत सुरू झाली आणि यात एक दहशतवादी ठार झाला.

हेही वाचलंत का? 

Source link

Leave a Reply